Sania Mirza News : भारताच्या स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि अॅना डॅनिलिना ही जोडी ऑस्ट्रेलियन ओपन 2023 (Australia Open 2023) स्पर्धेत पराभूत झाली आहे. ज्यामुळे निवृत्तीच्या वाटेवर असणाऱ्या सानिया मिर्झाला (Sania Mirza) महिला दुहेरीतून बाहेर पडावे लागले आहे. या महिला दुहेरी जोडीला बेल्जियमच्या अ‍ॅलिसन व्हॅन उटवांक आणि युक्रेनच्या अ‍ॅनहेलिना कॅलिनिना यांनी 4-6, 6-4 आणि 2-6 अशा फरकाने पराभूत केले. सानियाने आपले शेवटचे ग्रँडस्लॅम खेळताना हंगेरीच्या दल्मा गाल्पी आणि बर्नार्डा पेरा यांचा 6-2, 7-5 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सानिया भलेही महिला दुहेरीतून बाहेर पडली असेल, पण तिचा ऑस्ट्रेलियन ओपनचा प्रवास सुरूच आहे. सानिया आणि रोहन बोपण्णा या जोडीने मिश्र दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे. सानिया आणि बोपण्णा यांनी ऑस्ट्रेलियन वाइल्ड कार्ड एंट्री जेमी फोरलिस आणि ल्यूक सॅव्हिल यांचा 6-3 असा पराभव केला.


भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने काही दिवसांपूर्वीत निवृत्तीची घोषणा केली. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. सानियाने ऑस्ट्रेलियन ओपन 2016 दुहेरीचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी 2015 मध्ये तिने यूएस ओपन आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकल्या होत्या. सानियाने ऑस्ट्रेलियन ओपन 2009 ची मिश्र दुहेरी ही जिंकली होती. फ्रेंच ओपनमध्येही तिने भारताचं नाव मोठं केलं आहे. आता तिची ही अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धाही ती गाजवेल अशी आशा सर्व भारतीयांना असून महिला दुहेरीतील तिचं आव्हान संपलं असलं तरी मिश्र दुहेरीत तिचं आव्हान अजून कायम आहे.






गेल्या काही वर्षात सानियाचा खेळ


गेल्या काही वर्षांतील सानियाचे रेकॉर्ड बघितले तर 2020 मध्ये तिने एक सामना गमावला होता. त्यानंतर 2021 मध्ये एक सामना जिंकला आणि दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना सानियाला करावा लागला. 2022 मध्ये तिने दोन सामने जिंकले आणि तीन सामने गमावले. या वर्षी तिने एक सामना जिंकला आहे आणि एक गमावला आहे. 2016 हे वर्ष सानियासाठी खूप चांगले होते. त्यावर्षी तिने 14 सामने जिंकले होते. तर केवळ तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. यापूर्वी तिने 2014 मध्ये 11 सामने जिंकले होते.


हे देखील वाचा-