Nepali Cricketer Sandeep Lamichhane : आयपीएल (IPL) खेळलेला नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणात दोषी आढळला आहे. संदीपवर 18 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. काठमांडू जिल्हा न्यायालयाने संदीपला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. नेपाळच्या माजी कर्णधारावर ऑगस्ट 2022 मध्ये काठमांडूमधील एका हॉटेलमध्ये 18 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता, जो आता सिद्ध झाला आहे.






संदीपला किती काळ तुरुंगवास भोगावा लागणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी 10 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत निर्णय होणार आहे. न्यायाधीश शिशिर राज ढकल यांच्या खंडपीठाने आठवडाभर चाललेल्या सुनावणीचा समारोप केला आणि ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या बलात्काराच्या वेळी मुलगी अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट केले. बलात्काराच्या वेळी मुलगी अल्पवयीन होती, असे आरोप करताना म्हटले होते.






आंतरराष्ट्रीय कारकीर्द कशी होती?


23 वर्षीय संदीपने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 51 एकदिवसीय आणि 52 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 द्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांच्या 50 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 18.07 च्या सरासरीने 112 विकेट्स घेतल्या आहेत आणि 35 डावांमध्ये फलंदाजी करताना 376 धावा केल्या आहेत. याशिवाय, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 52 डावांमध्ये त्याने 12.58 च्या सरासरीने 98 विकेट घेतल्या आणि फलंदाजी करताना 19 डावात 64 धावा केल्या.


आयपीएलमध्येही आश्चर्यकारक कामगिरी 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय संदीप आयपीएलही खेळला आहे. तो दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल खेळला आहे. संदीपने आयपीएलचे एकूण 9 सामने खेळले. या सामन्यांच्या 9 डावांमध्ये गोलंदाजी करताना नेपाळच्या माजी कर्णधाराने 22.46 च्या सरासरीने 13 बळी घेतले. या कालावधीत त्याने 8.34 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या