सायना आणि सिंधूमधील या सामन्यात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. यावेळी पहिल्या गेममध्ये सायनानं सिंधूवर 21-17 अशी मात केली. पण दुसऱ्या गेममध्ये सिंधूनं सायनाला कडवं आव्हान दिलं. यावेळी सुरुवातील सिंधू आघाडीवर होती. पण नंतर सायनानं सिंधूला चुका करण्यास भाग पाडलं. ज्यामुळे सायनानं आपली पिछाडी भरुन काढणं सोपं गेलं. शेवटी सायनानं हा गेम 27-25नं जिंकत सामनाही आपल्या खिशात घातला.
सायनानं या सामन्यात सिंधूचा 21-17, 27-25 असा पराभव केला. या विजयासह सायनानं तिसऱ्यांदा राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. याआधी 2006 आणि 2007 ला सायनानं विजेतेपद पटकावलं होतं.