मुंबई : चीनसह जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस आता भारतातही पसरताना दिसतोय. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. या व्हायरसपासून वाचण्यासाठी अनेकजण जनगागृती करताना दिसत आहेत. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही याच संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केलाय. या व्हिडीओत कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याचं प्रात्यक्षिक देताना सचिन दिसत आहे.


सचिन तेंडुलकर यांच्या 20 सेकंदाच्या या व्हिडीओत त्यांनी हात कसे स्वच्छ धुवायचे याची प्रात्याक्षिकासह माहिती दिली आहे. यात हात धुताना ते माहितीही देताना दिसत आहेत. सचिन तेंडुलकर यांनी युनिसेफसाठी हा व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ प्रसिद्ध करताना सचिनने सर्वांसाठी एक संदेशही लिहला आहे. "मी प्रार्थना करतो, की कोरोना विषाणूचा हा प्रलय लवकर थांबावा. आपली एक चांगली कृती या आजारापासून आपल्या सुरक्षित ठेवेल. सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपण करू शकणारी सर्वात सोपी गोष्ट म्हणजे नियमितपणे हात स्वच्छ धुणे. कोरोना विषाणूविरुद्ध लढ्यात रात्रंदिवस काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना माझा सलाम, असंही त्यांनी म्हटलंय.

Womens T20 WC : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा भारतीय महिला संघाला मोलाचा सल्ला

देशभरात अनेक कार्यक्रम रद्द
कोरोना व्हायरसचे परिणाम आता सर्वच क्षेत्रात जाणवू लागलेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटारी बॉर्डरवर होणारा रिट्रीट सोहळा रद्द करण्यात आला आहे. तर दिल्लीतील नेमबाजी विश्वचषक आणि भोपाळमधला आयफा सोहळा देखील पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वीच सलमान खानच्या एका चित्रपटाचे शुटींगही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, दिल्लीत आणखी एकाला कोरोनाची बाधा झालीय. हा रुग्ण दिल्लीच्या उत्तम नगरचा रहिवासी आहे. नुकताच हा रुग्ण थायलंड आणि मलेशिया इथून भारतात परतला आहे. तर कोरोनाचा वाढता धोका बघता दिल्लीत होणारी नेमबाजीची विश्वचषक स्पर्धा पुढं ढकलण्यात आलीय. तर भोपाळमधे होणारा आयफा चित्रपट पुस्कार सोहळही पुढे ढकललाय.

EXPLAINER VIDEO | सचिन तेंडुलकरला लॉरियस पुरस्काराचा मान | बातमीच्या पलीकडे | ABP Majha