Sai Krishnan Cricket Stadium : क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा मैदानावर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि युवराज सिंगची (Yuvraj Singh) जादू पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही स्टार्स 18 जानेवारी (गुरुवार) रोजी कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील मुद्देनहल्ली येथील सत्य साई ग्राम येथे होणाऱ्या 'वन वर्ल्ड वन फॅमिली कप'मध्ये सहभागी होणार आहेत. एका संघाचे नेतृत्व सचिन तेंडुलकर करणार आहे, तर दुसऱ्या संघाचे नेतृत्व युवराज सिंग करणार आहे.






हे स्टार खेळाडूही सहभागी होणार 


या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन 'श्री मधुसूदन साई ग्लोबल परोपकारी सेवा अभियान' तर्फे केले जात आहे. सामन्यापूर्वी संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी साई कृष्णन क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन करतील. या 'वन वर्ल्ड वन फॅमिली कप'मध्ये हरभजन सिंग, मुथय्या मुरलीधरन, इरफान पठाण, चामिंडा वास, वेगवान गोलंदाज आरपी सिंग, मॉन्टी पानेसर, डॅनी मॉरिसन, व्यंकटेश प्रसाद यांसारखे सात देशांचे अनेक रेकॉर्डधारक खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंनी आपल्या देदीप्यमान कामगिरीने देशाचा गौरव केला होता.


पाच पाकळ्यांच्या आकाराच्या साई कृष्णन स्टेडियमची एकूण 3,500 प्रेक्षक क्षमता आहे. गॅलरीच्या मध्यभागी असलेला स्टेज खेळाडूंच्या पहिल्या गटाचे स्वागत करेल, जे क्रिकेटच्या माध्यमातून 'वसुधैव कुटुंबकम' ला आपला पाठिंबा देण्यासाठी एकत्र येतील. या सामन्याची विशेष बाब म्हणजे 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील काही निवडक खेळाडू प्रेक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.


भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 34 शतके झळकावणारे माजी कर्णधार सुनील गावसकर या सामन्याबद्दल म्हणाले, 'क्रिकेट हा खेळापेक्षा अधिक आहे, हे एक शक्तिशाली व्यासपीठ आहे जे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील लोकांना एकत्र करते. खेळामध्ये लोकांना एकत्र आणण्याची आणि समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याची क्षमता आहे, ज्याचा मी गेल्या अनेक वर्षांपासून साक्षीदार आहे. वंचित लोकांच्या जीवनातील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधणे हा या अनोख्या मैत्री सामन्याचा उद्देश आहे.


इतर महत्वाच्या बातम्या