Maldive and TV actress : अलीकडेच मालदीव सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. ज्यानंतर मालदीववर (Maldive) बहिष्काराचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याचबरोबर आता बॉयकॉटचा परिणाम मालदीववरही दिसून येत आहे. त्यानंतर भारत आणि मालदीवमध्ये अचानक वाद सुरू झाला आहे. दरम्यान, हा वाद सुरु असताना अभिनेत्री आदिती भाटीया मालदीवमध्ये गेली आणि तेथील फोटोही तिने शेअर केले. यानंतर नेटकऱ्यांनी तिला तुफान ट्रोल केले आहे.


आदिती भाटिया नेटकऱ्यांकडून ट्रोल (Maldive and TV actress)


अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आता लोकांना मालदीवऐवजी (Maldive) लक्षद्वीपला जाण्याचा सल्ला देत आहेत. इतकेच नाही तर अनेक सेलिब्रिटी आता मालदीवऐवजी लक्षद्वीपला जाण्यासाठी उत्सुक आहेत. अनेक टीव्ही कलाकारही लक्षद्वीपला पाठिंबा देताना दिसत आहेत. मात्र, टीव्ही कलाकार आणि अभिनेत्री आदिती भाटीया मालदीव-लक्षद्वीपला वाद सुरु असताना मालदीवला गेली. ती इतक्यावरच थांबली नाही. तर तिने मालदीवमधील फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले. 


मालदीवमधील फोटो केले शेअर (Maldive and TV actress)


आदिती भाटियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री मालदीवची (Maldive) ट्रीपमध्ये आनंदात दिसत आहे. या फोटोंमध्ये आदितीने मालदीवची प्रत्येक खास गोष्ट दाखवली आहे.
आदितीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आदिती मालदीवच्या समुद्रकिनारी एंजॉय करताना दिसत आहे. 


आदितीने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. नेटकरी तिच्या फोटोवर कमेंट्स करुन ट्रोल करताना दिसत आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये आदिती खूपच बोल्ड दिसत आहे. मालदीवमधील फोटो पाहून चाहत्यांनी अभिनेत्रीवर कमेंट्स करुन रोष व्यक्त केलाय. 


 














 


इतर महत्वाच्या बातम्या 


Aamir Khan And Reena Dutta divorced: आमिर खानने पहिली बायको रीना दत्ताला रक्ताने लिहिले होते प्रेमपत्र; 'या' कारणामुळे 16 वर्षांनी नातं तुटले!