मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर अॅडम गिलख्रिस्टने आपला वाढदिवस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी साजरा केला. 14 नोव्हेंबर हा गिलख्रिस्टचा जन्मदिन आहे. या दिवशी गिलख्रिस्ट मुंबईतच असल्याने सचिनसोबत बर्थ डे सेलिब्रेशन करण्यात आलं.
https://twitter.com/gilly381/status/798135243974680576
सचिननेही गिलख्रिस्टला खास सरप्राईज दिलं. सचिनने गिलख्रिस्टसाठी खास 'गिली' केक बनवून बर्थ डे सेलिब्रेशन केलं. गिलख्रिस्टने केकचा फोटो ट्विटरला शेअर केला आहे. गिलख्रिस्टला क्रिकेट विश्वात गिली या नावानेच ओळखलं जातं.
https://twitter.com/virendersehwag/status/798115010996097024
सचिनसह गिलीला अनेक दिग्गजांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याला भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागही अपवाद नाही. विरुने आपल्या नेहमीच्या शैलीत गिलख्रिस्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.