मुंबई : सुट्ट्या पैशांचा तुटवडा पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांकडून 24 नोव्हेंबरपर्यंत 50 किलोपर्यंतच्या शेतमालाचा एक रुपयाही घेऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ या निवासस्थानी विविध विभागांच्या सचिवांची बैठक घेऊन 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. विविध सचिव आणि रिझर्व्ह बँकेचे अधिकारी यांच्याशी त्यांनी यावेळी सविस्तर चर्चा केली.

एसटीमधून शेतकऱ्याला 50 किलोपर्यंत भाजीपाला कोणतेही शुल्क न आकारता नेऊ देण्यास एसटी महामंडळाने परवानगी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत ही सवलत लागू असेल. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचविता येणार असून, त्यातून त्यांच्या मालाला चांगली किंमतसुद्धा मिळेल.

आता 18 नोव्हेंबरपर्यंत टोलमुक्ती

मुंबईसह राज्य महामार्गावरील टोल सवलत 18 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यानी दिले. याशिवाय बॉर्डर चेकपोस्टवर दंड आणि प्रलंबित देणी 500 आणि 1000 रूपयांच्या जुन्या नोटांमधून देता येतील, असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यातील सर्व विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क, शैक्षणिक शुल्क इत्यादी शुल्क हे चेकने स्वीकारावेत, असा निर्णय घेण्यात आला. यात महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पॉलिटेक्निकचासुद्धा समावेश असेल. यातून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, बँकांवरील ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.

स्कूल बस असोसिएशचा संप मागे

स्कूलबस ऑपरेटर्सशी संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा केली असून, त्यांनी संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांचं बँक प्रतिनिधींना आवाहन

मोठ्या शहरांमध्ये आणि राज्यातील दुर्गम भागात मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून नोटा बदलून देण्यासाठी बँकांनी सामान्य नागरिकांना मदत करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बँकांच्या प्रतिनीधींना सांगितलं.

दरम्यान सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, दूधकेंद्र यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी एक हजार आणि पाचशे जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आणखी दहा दिवस म्हणजेच 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली. यापूर्वी सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, दूध केंद्र, टोल यासारख्या ठिकाणी जुन्या नोटा 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्यात येणार होत्या. मात्र ही मुदत वाढवण्यात आल्यामुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या

तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश


500च्या नोटा नाकारल्यानं अर्भकानं जीव गमावला, डॉक्टरांनी आरोप फेटाळले


यूपीआय काय आहे, आणि ते कसं काम करतं?


सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, टोलला जुन्या नोटा स्वीकारण्यास मुदतवाढ


बँकांबाहेर चार स्वतंत्र रांगा, तर मेडिकलमध्ये जुन्या नोटा चालणार


काळा पैसावाले झोपेच्या गोळ्या खात आहेत : मोदी


सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, टोलला जुन्या नोटा स्वीकारण्यास मुदतवाढ


सरकारने पैसे काढण्याची आणि नोटा बदलण्याची मर्यादा वाढवली!


तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश


यूपीआय काय आहे, आणि ते कसं काम करतं?


कॅशचा तुटवडा, ‘पेटीएम’, ‘पेझॅप’सारखे ई-वॉलेट कसे वापराल?