मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने पहिल्याच सामन्यात आपले वडिल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पावलावर पाऊल ठेवले आहे.
अर्जुन तेंडुलकरची अंडर 19 भारतीय संघात श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली आहे. या दौऱ्यात चार दिवसीय दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. दौऱ्यातील पहिल्या सान्यात अर्जुनला शून्यावर बाद होण्याची वेळ आली. योगायोग म्हणजे सचिनसुद्धा आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान विरुद्ध शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे अर्जुनने वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.
अर्जुनने पहिल्याच सामन्यात आपला पहिला बळी मिळवला. पण त्या फलंदाजीत त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. सामन्याच्या पहिल्या डावात 11 चेंडूत त्याला एकही धाव काढता आली नाही. शाशिका दुलशान याच्या गोलंदाजीवर अर्जुन बाद झाला.
योगायोग म्हणजे पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात सचिनही शून्यावर बाद झाला होता. मात्र हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना नव्हता. त्याआधी सचिनने कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
भारतीय संघाने श्रीलंकेचा पहिला डाव 244 धावांमध्ये आटोपला, तर अंजू रावतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 589 धावांचा डोगर रचला. यात बादोनीने 185 धावा करत भारताला भक्कम स्थितीत आणून ठेवले. तसेच सलामीचा फलंदाज तायडेने 113 धावा केल्या तर वढेराने 82 धावा केल्या.
तेंडुलकर पिता-पुत्रांचा ‘शून्य’ विक्रम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jul 2018 08:44 AM (IST)
दौऱ्यातील पहिल्या सान्यात अर्जुनला शून्यावर बाद होण्याची वेळ आली. योगायोग म्हणजे सचिनसुद्धा आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान विरुद्ध शून्यावर बाद झाला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -