Ruturaj Gaikwad : टीम इंडियाचा भविष्यातील सलामीवीर म्हणून आपलं स्थान दिवसागणिक बळकट करत चाललेल्या ऋतुराज गायकवाडने मोठा पराक्रम आपल्या नावे केला आहे. ऋतुराजने टी-20 प्रकारात वेगाने  4 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. भारताकडून यापूर्वी हा पराक्रम केएल राहुलने केला होता. त्याने 117 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. ऋतुराजने हा पराक्रम 116 डावांमध्ये केला. 






T20 क्रिकेटमध्‍ये सर्वात जलद 4,000 धावा (इनिंगद्वारे) 


107 - ख्रिस गेल
113 - शॉन मार्श
115 - बाबर आझम
116 - डेव्हॉन कॉन्वे
116 - रुतुराज गायकवाड
117 - केएल राहुल


टीम इंडियाचा नवा हिटमॅन


ऋतुराज गायकवाडने टीम इंडियाचे नेतृत्व करताना राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले होते. वर्ल्डकपला त्याला संधी मिळाली नव्हती. मायदेशात सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने चमकदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या टी-20 मध्ये त्याने पहिल्या 21 चेंडूत 21 धावा केल्यानंतर नंतरच्या 36 चेंडूत 102 धावांचा पाऊस पाडला होता. यशस्वी जैस्वालही दमदार कामगिरी करत आहे. मात्र, ऋतुराजने बाजी मारली आहे.






ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात अवघ्या 52 चेंडूत झंझावाती शतक झळकावले. त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिलेच शतक होते. 215 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने केवळ 57 चेंडूत नाबाद 123 धावा केल्या. गायकवाडनेही या खेळीत एकूण 13 चौकार आणि 7 षटकार मारले. यासह गायकवाड टी-20 मध्ये भारताकडून शतक झळकावणारा 9वा फलंदाज ठरला आहे. 






दरम्यान, निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिन्ही प्रकारच्या मालिकेसाठी 31 खेळाडूंचा संघ जाहीर केला. यातील 17 सदस्यीय संघ T-20 साठी आणि 16-16 एकदिवसीय-कसोटीसाठी जाहीर करण्यात आले आहेत. तिन्ही संघात फक्त 3 खेळाडू आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि मुकेश कुमार यांना स्थान मिळाले आहे. ऋतुराज गायकवाड, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार, जे तिन्ही फॉरमॅटमध्ये आहेत. त्यांना T-20, वनडे आणि कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या