IPL 2021, RR vs PBKS : आज आयपीएलमधील चौथा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स खेळला जातोय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जात असलेल्या या सामन्यात पंजाबनं कर्णधार केएल राहुल आणि दीपक हुडाच्या धमाकेदार खेळीच्या बळावर राजस्थानसमोर 222 धावांचं आव्हान दिलं आहे. केएल राहुलच्या 91 आणि दीपक हुडाच्या 64 धावांच्या बळावर पंजाबनं सहा बाद 221 धावा केल्या.
पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी केली. मयंकला मोठी खेळी करता आली नाही. तो 14 धावांवर चेतन साकरियानं बाद केलं. यानंतर ख्रिस गेल आणि राहुलने चांगली भागिदारी केली. गेलला 40 धावांवर रियान परागनं बाद करुन मोठं यश मिळवून दिलं. गेलने 28 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 40 धावा केल्या.
गेलनंतर मैदानात आलेल्या दीपक हुड्डाने आक्रमक फटकेबाजी केली. त्यानं अवघ्या 20 चेंडूत आपलं अर्धशतक केलं. राहुलसोबत त्यानं शतकी भागिदारी केली. अवघ्या 45 चेंडूत या दोघांनी शतकी भागीदारी केली. यानंतर दीपक 28 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 64 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेल्या पूरनला शून्यावर बाद केले. चेतन साकरियानं त्याचा भन्नाट झेल पकडला.
एकीकडे गडी बाद होत असताना दुसरीकडे कर्णधार राहुलनं आपली फटकेबाजी सुरुच ठेवली होती. डावाच्या शेवटच्या षटकात लोकेश राहुल बाद झाला. राहुलने 91 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 5 षटकार लगावले.