T20 World Cup 2022: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) सज्ज झाला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दुबईत (Dubai) पार पडलेल्या मागच्या टी-20 विश्वचषकात विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात मैदानात उतरणारी टीम इंडियाच्या (Team India) हाती निराशा पडली. पण यंदा ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या आठव्या आवृत्तीत रोहित शर्मा भारतीय संघाची धुरा संभाळतोय आयसीसी स्पर्धेत भारताचं नेतृत्व करण्याची रोहितची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, रोहित शर्मानं 2021च्या टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात नेमके कोणते बदल झाले आहेत? यावर भाष्य केलंय.
या स्पर्धेत भारत त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 23 ऑक्टोबरला खेळणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, या सामन्याला दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल. या सामन्यापूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मानं गेल्या वर्षाभरात भारतीय संघात झालेल्या बदलांवर भाष्य केलं आहे.
ट्वीट-
रोहित शर्मा काय म्हणाला?
“संघ व्यवस्थापकांनी सगळ्यांनाच आपपले निर्णय घेण्याचं स्वातंत्र दिलं आहे. आपल्या निर्णयाचा परिणाम काय होईल? याचा अधिक विचार न करता त्या निर्णयांना मागं सारणं हे टाळलं पाहिजे. तसेच आपला माइंटसेट योग्य असेल तर आपल्याला कशाचेही भय नाही. आम्ही छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष दिले आहे. ज्यामुळे खेळाडूला चांगली कामगिरी करता येते", असं रोहित शर्मानं म्हटलंय.
भारतासाठी खेळणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट
“भारतासाठी खेळणे माझ्यासाठी महत्वाचे असून तो एक सन्मानच आहे, मग तो सामना मी एखादा खेळाडू म्हणून खेळेल किंवा कर्णधार म्हणून,” असंही रोहितनं पुढं म्हटलंय. महत्वाचं म्हणझे, रोहितच्या कारकिर्दीतील हा आठवा टी-20 विश्वचषक आहे. 2007 मध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतानं टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी रोहित शर्मा भारतीय संघाचा सदस्य होता. आतापर्यंतचे सगळे टी-20 विश्वचषक खेळणारा रोहित शर्मा एकमेव भारतीय खेळाडू आहे.
हे देखील वाचा-