Rohit Sharma Ind Vs Eng ODI: भारताचा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने रविवारी इंग्लंडमधील लॉर्डसच्या मैदानावर वादळी खेळी करत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा याच्या निवृत्तीच्या (Rohit Sharma Retirement) चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे भारतीय वन डे संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चेनंचाहत्यांमध्येहीखळबळउडालीहोती. मात्रहिशक्यात बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी फेटाळून लावलीय. तरदुसरीकडे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा नुसताचखेळालानाहीतरचक्क 138 धावांची ऐतिहासिक खेळीनं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देखीलदिलं. लॉर्ड्सवर एकदिवसीय शतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 110 चेंडूंच्या या खेळीत त्याने ५ षटकार आणि 17 चौकार मारले. त्याने शुभमन गिलसोबत 147 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी जोडली. (Rohit Sharma on ODI Retirement News)

Continues below advertisement

असेअसलंतरी रोहितने 2027 च्या एकदिवसीय विश्वचषक संघात असेल असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले नव्हते. मात्र आता, रोहित शर्माने स्वतः या वृत्तांवर आपली प्रतिक्रिया देतभाष्यकेलंआहे. लॉर्ड्सवरील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यानंतर तो यावर बोलला आणि म्हणाला कि, "बर्मिंगहॅममध्ये विजय मिळवून आम्ही चांगली सुरुवात केली, त्यानंतर कार्डिफमध्ये आमचा पराभव झाला. आज फलंदाजीची सुरुवात चांगली झाली, पण तरीही आम्ही हरलो."

Rohit Sharma on Retirement:  निवृत्तीच्या अफवांवर रोहित शर्माची प्रतिक्रिया

रोहित शर्मा म्हणाला, "चांगली फलंदाजी करणे हे माझे काम आहे. मला माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. मी पदार्पण केल्यापासून बाहेरच हे बोलणे सुरू आहे. जोपर्यंत मी इथे आहे, तोपर्यंत ते सुरूच राहील. यापैकी कशाचीही मला पर्वा नाही. मी मैदानावर काय करतो हे महत्त्वाचे आहे. मी माझा सर्वोत्तम प्रयत्न करतो, मी माझ्या संघाच्या यशात योगदान देण्याचा प्रयत्न करतो. आणि सध्या, माझे संपूर्ण लक्ष त्यावरच आहे. आणि बाहेरच्या या चर्चा होऊ द्या, कारण जर त्या झाल्या नाहीत, तर त्यात मजा राहणार नाही. माझे काम मैदानावर आहे आणि त्यांचे मैदानाबाहेर."

इतर महत्वाच्या बातम्या