मुंबई : भारताचा फलंदाज रोहित शर्माने रविवारी सलामीवीर म्हणून एका वर्षात सर्वाधिक रन काढण्याचा सनथ जयसूर्याचा 22 वर्ष जुना विक्रम तोडाला आहे. वेस्टइंडीज विरोधातील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात खेळताना हा विश्वविक्रम रोहितने आपल्या नावे केला आहे.


वेस्टइंडीज विरोधातील आजच्या सामन्यात खेळण्याआधी रोहित या रेकॉर्डपासून अवघा 9 धावा दूर होता. श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज सनथ जयसूर्याने 1997 या एका वर्षात 2387 रन आपल्या नावावर जमा केले होते. रोहितने वेस्टइंडीजचा गोलंदाज शेल्डन कोट्रेलच्या चेंडूवर एक धाव घेत जयसूर्याचा हा विक्रम तोडला आहे. मुंबईच्या या खेळाडूनं बाराबती स्टेडियम 63 रनांची खेळी करत 2442 रन आपल्या खात्यावर जमा केले. रोहितने 47 डावांमध्ये 53.08 च्या सरासरीने या वर्षात सर्व प्रकारात 10 शतकं आणि तेवढीचं अर्धशतकीय खेळ्या केल्या आहेत.

एका वर्षात सर्वाधिक धावा काढणारे खेळाडू - 
रोहित शर्मा - 2442 (2019)
सनथ जयसूर्या - 2387 (1997)
वीरेंद्र सेहवाग - 2355(2008)
मॅथ्यू हेडन - 2349 (2003)
विक्रमवीर रोहित -
एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. भारताकडून क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक करणाऱ्यांमध्ये रोहित शर्माचा समावेश आहे. त्याच्याशिवाय अशी कामगिरी केवळ सुरेश रैना आणि केएल राहुल यांनी केली आहे. एका कसोटी मालिकेत तीन शतकं झळकावणारा रोहित हा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला. यापूर्वी लीटल मास्टर सुनील गावस्कर यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षातील रोहितचे हे नववे आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. त्यानं या कामगिरीसह सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. तेंडुलकरने 1998 च्या कॅलेंडर वर्षात 9 शतकं झळकावली होती.

संबंधित बातम्या :

INDvsWI | टीम इंडियाचा शानदार मालिका विजय, वेस्ट इंडिजवर चार विकेट्सने मात

मुंबईचा उदयोन्मुख फलंदाज यशस्वी जैस्वाल करोडपती; किक्रेटसाठी अकराव्या वर्षी सोडलं होतं घर

IPL 2020 : तब्बल 7.75 कोटींची बोली लागल्यामुळे शिमरॉन हेटमायरचा जोरदार डान्स

Yashasvi Jaiswal | अवघ्या 18व्या वर्षी मुंबईचा उदयोन्मुख फलंदाज यशस्वी जैस्वाल करोडपती | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha