मुंबई : सीएएला विरोध दर्शवल्यामुळे हरियाणा सरकारने अभिनेत्री परिणीती चोप्राला 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेमधून काढून टाकल्याची बातमी व्हायरल झाली होती. मात्र, ही बातमी खोटी असून एप्रिला 2017 मध्येच हरियाणा सरकारसोबतचा परिणीतीचा करार संपल्याची माहिती तिच्या प्रवक्त्याने दिली आहे. त्यामुळे खोट्या बातम्या पसरवू नका, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात परिणीती चोप्राने ट्विट केल्यामुळे हरियाणा सरकारच्या महिला व बालविकास विभागाने तिची 'बेटी बचाओ बेटी पढ़ाओ' या मोहिमेतून हकालपट्टी केल्याची बातमी पसरली होती. परिणीतीने 17 डिसेंबरला एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये तिने म्हटले होते की, CAA सारखे कायदे बनवल्यानंतर त्याला एखादा नागरिक विरोध करु लागला आणि हा सगळा प्रकार (हिंसक आंदोलन)घडू लागला तर आणि CAA विसरायला हवा. इथून पुढे आपण आपल्या देशाला लोकशाही राष्ट्र न म्हटलेलं बरं. आपली मत मांडणाऱ्या लोकांना मारणे हा निर्दयीपणा आहे. जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठातील पोलिसांच्या लाठीमारानंतर बॉलीवूड कलाकारांनी सरकार आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त केली होती.

हरिणाया सरकारचं स्पष्टीकरण -
परिणीती चोप्राला या मोहिमेमधून काढून टाकल्याची बातमी चुकीची असल्याचे हरियाणा सरकारच्या महिला व बालविकास विभागाने म्हटले आहे. विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ट्विट केल्याने अभिनेत्रीला ब्रँड अ‍ॅम्बेसेडरच्या भूमिकेतून हटवले गेले नाही. आम्ही परिणीतीसोबत एक वर्षाचा करार केला होता, जो एप्रिल 2017 मध्ये संपला. नंतर तो करार नूतनीकरण करण्यात आलं नाही.

पंतप्रधान मोदींची CAA चा विरोध करणाऱ्यांवर टीका - 
गेल्या काही दिवसांपासून देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच लोकांशी बोलले. नरेंद्र मोदी म्हणाले की, आंदोलनांद्वारे तुम्हाला विरोध करायचाच असेल तर तुम्ही माझे पुतळे जाळून आंदोलन करा, पण हिंसाचार, शाकीय मालमत्तेची हानी तसेच गरिबांची वाहने जाळू नका, असे आवाहन मोदींनी केले. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या सभेत मोदी बोलत होते.

हेही वाचा  - CAA : ममता दीदी तुम्हाला कोलकात्याची जनता शत्रू का वाटते?, मोदींचा सवाल

PM Modi | नागरिकत्व कायदा तुमच्या उज्जवल भविष्यासाठी : नरेंद्र मोदी | ABP Majha