मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं 137 धावांनी विजय मिळवला. या मालिकेत भारताचा विकेटकीपर ऋषभ पंतनं एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. पंत एखाद्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक कॅच घेणारा विकेटकीपर ठरला आहे.


ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने नॅथन लियोनची कॅच घेत तिसऱ्या कसोटी सामन्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऋषभची पंत  मालिकेतील ही 20 वी कॅच होती. या कॅचनंतर ऋषभ एखाद्या मालिकेत सर्वाधिक कॅच घेणारा विकेटकीपर ठरला. पंतने नरेन तम्हाने आणि सय्यद किरमानीचा विक्रम मोडला.


तम्हाने आणि किरमानी यांनी एखाद्या सीरिजमध्ये सर्वाधिक 19-19 कॅच घेतल्या आहेत. तम्हाने यांनी पाकिस्तानविरोधात 1954-55 मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत 19 कॅच घेतल्या होत्या. तर किरमानी यांनी पाकिस्तानविरोधातच 1970-80 मध्ये सहा सामन्यांच्या मालिकेत 19 कॅच घेतल्या होत्या. मात्र पंतने 20 विकेट घेत तम्हाने आणि किरमानी यांनी मागे टाकलं आहे.


भारताचा 150 वा विजय


ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसऱ्या सामन्यातील विजय कसोटी क्रिकेटमधील भारताचा 150 वा विजय होता. भारतानं 532 हे यश मिळवलं आहे. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने 384, इग्लंडने 364, वेस्टइंडिजने 171 आणि दक्षिण आफ्रिकेने 162 कसोटी सामने जिंकले आहेत. ऑस्टेलियाचा हा 222 वा पराभव आहे.


मेलबर्न कसोटी जिंकण्याची  37 वर्षांतील पहिलीच वेळ


टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न कसोटी जिंकण्याची गेल्या 37 वर्षांमधली ही पहिलीच वेळ आहे. याआधी सुनील गावस्करांच्या भारतीय संघाने 1981 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न कसोटी जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने तमाम भारतीयांना अभिमानास्पद असा पराक्रम मेलबर्नवर गाजवला आहे.


मेलबर्नवरच्या या विजयाने भारताला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. याचा अर्थ सिडनीची अखेरची कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली तरी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही गतविजेत्या टीम इंडियाकडेच कायम राहील.