रिओ दी जानेरो : अमेरिकेचा विश्वविक्रमवीर जलतरणपटू मायकल फेल्प्स आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. फेल्प्सचा समावेश असलेल्या अमेरिकेच्या संघाने फोर बाय हंड्रेड फ्रीस्टाईल रिले प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

 

मायकल फेल्प्ससह कॅलेब ड्रेसेल, रायन हेल्ड आणि नॅथन अॅड्रियनचा अमेरिकेच्या संघात समावेश होता.

 

मायकल फेल्प्सचं ऑलिम्पिकमधलं आजवरचं हे 19वं सुवर्णपदक ठरलं. फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये एकूण 23 पदकांची कमाई केली आहे.

 

फेल्प्सने त्याच्या पहिल्याच म्हणजे अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण आणि 2 कांस्य पदकाची कमाई करुन विक्रम रचला होता. त्यानंतर बीजिंग ऑलिम्पिक 8 सुवर्णपदक खिशात टाकले होते. यानंतर लंडन ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक आणि आताच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 1 सुवर्णपदकाची कमाई केली आहे.