SHOCKING रिओ ऑलम्पिक 2016मधील सुवर्ण पदकात 82 पट चांदी
एबीपी माझा वेब टीम | 02 Aug 2016 11:50 AM (IST)
रिओ दि जिनेरियओ: रिओ ऑलम्पिकमध्ये जगभरातील 206 देशातील खेळाडूंचे जास्तीत जास्त सुवर्ण पदकांची लयलुट करण्याचे लक्ष असेल. मात्र, दरवेळी प्रमाणे यावेळीही या पदकांमध्ये सोन्याची मात्र कमी आणि चांदीची मात्रा अधिक आहे. या सुवर्ण पदकांमध्ये तब्बल 82 पट चांदीचे प्रमाण असल्याचे समोर आले आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, रिओ ऑलम्पिकमध्ये जे खेळाडू सुवर्ण पदक कमावण्याचे स्वप्न पाहात आहेत, त्या सुवर्ण पदाकांमध्ये 494 ग्रॅम चांदी आणि केवळ 6 ग्रॅमच सोने आहे. बाजारात याची किंमत 587 डॉलर (39 हजार रुपये) आहे. ऑलम्पिकमध्ये 1912 सालातील स्टॉकहोम ऑलम्पिक स्पर्धेत संपूर्णपणे शुद्ध सोन्याची पदके देण्यात आली होती. सध्या ब्राझीलने रिओ ऑलम्पिकसाठी 5000 पेक्षा अधिक पदके तयार केलेली आहेत. यामध्ये सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकांचा समावेश आहे.