Cristiano Ronaldo Girlfriend : स्टार फुटबॉल प्लेअर ख्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूपैकी एक आहे. रोनाल्डो फूटबॉल व्यतिरिक्त आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. यावेळी रोनाल्डो प्रेयसी जॉर्जिना रोड्रिगेज (Georgina Rodriguez)मुळे चर्चेत आहे. एका रिपोर्ट्सनुसार, रोनाल्डो जॉर्जिना रोड्रिगेजला प्रत्येक महिन्याला 80 लाख रुपयांपेक्षा जास्त पेसे देतो. ब्रिटिश मीडियाने गर्लफ्रेंडला दिल्या जाणाऱ्या पैशांना पगार म्हटलेय.
El Nacional च्या वृत्तानुसार, जॉर्जिना रोड्रिगेजला रोनाल्डो प्रत्येक महिन्याला 83,000 पाउंड (82 लाख रूपयापेक्षा अधिक ) रकम 'मुलांचा सांभाल करण्यासाठी आणि इतर खर्चासाठी दिली जाते. याआधी रोनाल्डोने गर्लफ्रेंड जॉर्जिनाला अडीच कोटी रुपयांची कार भेट दिली होती.
रोनाल्डो आणि जॉर्जिना लग्जरी लाइफस्टाइल जगतात. त्यांच्या झलक सोशल मीडिवर दिसते. जॉर्जिना आणि रोनाल्डो 2017 पासून एकत्र आहे. दोघांची चर्चा सोशल मीडियावर आहे. त्यांच्या फोटोवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतो. जॉर्जिना पेशाने एक मॉडल आहे. अनेक ब्रँड्ससाठी जाहिरातीही केल्या आहेत. इंस्टाग्रामवर 36 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. जॉर्जियाच्या एका फोटोवर लाखो लोकांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव पडतो.