कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 44 वर्षानंतर 'त्या' विक्रमाची पुनरावृत्ती
याशिवाय 1953 सालातही लॉर्डस मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यातही दुसऱ्या विकेटसाठी तीन खेळीत 100 हून अधिक धावांची भागिदारी झाली.
यापूर्वी 1972-73दरम्यान एमसीजी मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात अशाच प्रकारची भागिदारी झाली होती.
या सामन्यादरम्यान दुसऱ्या विकेटसाठी तीन खेळीत 100 हून धावांसाठी भागिदारी झाली. पाहिल्या खेळीत भारताच्या मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी 112 धावांची भागिदारी केली. यानंतर दुसऱ्या खेळीत न्यूझीलंडच्या टॉम लेथम आणि विलियमसन यांच्या 124 धावांची भागिदारी झाली. यानंतर पुन्हा भारतीय संघाने फलंदाजीस सुरुवात केल्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा या जोडगोळीने 133 धावांची भागिदारी करत विक्रम रचला.
या सामन्यादरम्यान जो नवा विक्रम रचला गेला, तो यापुर्वी दोन कसोटी सामन्यात रचला गेला.
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान कानपूरमध्ये सुरु असलेल्या 500 व्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 44 वर्षानंतर पुन्हा एका घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.