RCB vs RR, IPL 2021 1st Innings Highlights: मुंबईत सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात  राजस्थाननं बंगळुरुसमोर विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. विजयाचा चौकार मारण्याच्या उद्देशाने विराट कोहलीची आरसीबी मैदानात उतरली आहे. तर राजस्थानला स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची आशा आहे. 


रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. राजस्थानने सुरुवातीला चार विकेट झटपट गमावल्या. सुरुवातीला जोस बटलर, मनन वोहरा, डेविड मिलर आणि संजू सॅमसन स्वस्तात बाद झाल्यानं राजस्थानचा डाव गडगडला. मात्र शिवम दुबे आणि रियाननं राजस्थानचा डाव सावरला.  चुकीचा फटका मारण्याच्या नादात रियान पराग 25 धावा करुन बाद झाला. तर शिवम दुबे केन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन बाद झाला. शिवमने 32 चेंडूत 46 धावांची खेळी केली.


त्यानंतर राहुल तेवतियाने 23 चेंडूत 40 धावांची खेळी केली.  मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी करत 4 षटकात 27 धावा देत 3 तर हर्षल पटेलने 4 षटकात 47 धावा देत 3 गडी बाद केले.