राजकोटः भारताचा ऑलराऊंडर खेळाडू रविंद्र जडेजा चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे. जडेजावर वन्य प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. जडेजा कुटुंबासोबत जंगल सफारी करण्यासाठी गीर सिंहांच्या जगलात गेला होता. मात्र वन विभागाच्या गाडीतून खाली उतरुन सिंहांसोबत फोटो काढल्यामुळे जडेजा अडचणीत आला आहे.


 

 

वन सफारी करताना वन विभागाच्या गाडीतून खाली उतरुन गीर सिंहांसोबत फोटो काढला, जडेजाने हा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. गीर जंगलामध्ये कायद्याने गाडीतून उतरण्यास मनाई आहे, त्यामुळे जंगल प्राणी संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे.

 

 

वन विभागाकडून चौकशीचे आदेश

जडेजा बुधवारी गुजरातमधील गीर नॅशनल पार्क येथे जंगल सफारीसाठी गेला होता. त्यावेळी जडेजाने वन विभागाच्या गाडीतून जंगल सफारी केली. जंगल विभागाच्या गाडीतून खाली उतरणं किंवा प्राण्यांना कसलाही त्रास होईल असं कृत्य करणं वन विभागाच्या कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे जडेजाने सफारी करताना जडजाने कायद्याचं उल्लंघन केलं की नाही याची चौकशी केली जाणार आहे. जडेजा दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

सर जडेजाच्या या कृत्यामुळे त्याच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे वन विभाग चौकशीनंतर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.