LIVE : औरंगाबादः छगन भुजबळांच्या समता परिषदेला खिंडार
एबीपी माझा वेब टीम | 17 Jun 2016 01:59 AM (IST)
हेडलाईन्स 1. गुलबर्ग सोसायटी जळीतकांडप्रकरणी 24 दोषींना आज शिक्षा सुनावणार, 36 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता, निकालाकडे देशाचं लक्ष -------------------- 2. मान्सूनच्या धीम्या वाटचालीने शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग, जूनमध्ये सरासरीपेक्षा 22 टक्के कमी पाऊस, कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भात राज्य सरकारकडून तयारी -------------------- 3. काँग्रेसला सत्तेची मस्ती भोवली, चंद्रपुरात राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेलांची जोरदार टीका, काँग्रेसच्या भरवशावर सत्ता परिवर्तन होणार नसल्याचंही वक्तव्य ------------------------ 4. 'करुन दाखवलं', म्हणणारे तुरुंगात जातील, आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, रस्ते घोटाळ्याप्रकरणी 10 लेखापाल गजाआड -------------------- 5. गिरीश महाजन यांची आमदारकी रद्द करा, राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे तक्रार, जमिनीच्या खरेदीची नोंद निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवली -------------------- 6. छगन भुजबळ यांचा आर्थर रोडमधला मुक्काम लांबला, हायकोर्टाने जामीन फेटाळला, प्रकृतीचं कारण देऊन तुरुंगातून निसटण्याचा प्रयत्न -------------------- 7. दाभोलकर हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडेला 20 जूनपर्यंत कोठडी, कराडच्या विनय पवारचा कटात सहभाग असल्याचाही दावा तर कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी -------------------- 8. यूपी आणि पंजाबच्या निवडणुकीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर, सातव्या वेतन आयोगात 30 टक्के पगारवाढीचा प्रस्ताव, ऑगस्टपासून अंमलबाजावणीची शक्यता -------------------- 9. सुलतान आणि दंगल सिनेमाची कथा वेगळी, लुधियानात अभिनेता आमिर खानचं स्पष्टीकरण, तर पैलवानच्या भूमिकेसाठी सलमानसारखी बॉडी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली -------------------- 10. प्रदर्शनाआधीच चर्चेत आलेला उडता पंजाब आज प्रेक्षकांच्या भेटीला, तर तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार -------------------- एबीपी माझा वेब टीम