हैदराबाद : बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पण रवींद्र जाडेजाच्या खास सेलिब्रेशनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.

हैदराबाद कसोटीत मुरली विजयने शतक, विराट कोहलीने द्विशतक ठोकलं. कोहली बाद झाल्यानंतर विकेटकीपर रिद्धिमान साहा, आर.अश्विन यांनी सामन्यात मज्जा आणली. यानंतर भारताचा अष्टपैलू रवींद्र जाडेजानेही धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.

जाडेजाने नाबाद अर्धशतक ठोकलं आणि आपल्या खास स्टाईलमध्ये सेलिब्रेशनही केलं. अर्धशतक पूर्ण होताच जाडेजा बॅट तलवारसारखी चालवायला लागला. जाडेजाने यापूर्वीही अनेक वेळा मैदानात त्याच्या तलवारबाजीचं दर्शन घडवलं आहे.

https://twitter.com/BCCI/status/829992030176686082