दुबई : भारताच्या रवींद्र जाडेजाने बांगलादेशच्या शकिब अल हसनला पिछाडीवर टाकून, आयसीसीच्या कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतही रवींद्र जाडेजा आघाडीवर आहे.
अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जाडेजाच्या खात्यात 438 गुण असून, शकिबने 431 गुणांसह दुसरं स्थान राखलं आहे. जाडेजाने श्रीलंका दौऱ्यातल्या कोलंबो कसोटीत अष्टपैलू कामगिरी बजावून, भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
जाडेजाने कोलंबो कसोटीत नाबाद 70 धावांची खेळी आणि दोन्ही डावांमध्ये मिळून सात विकेट्स अशी कामगिरी बजावली. कोलंबो कसोटीतल्या प्रभावी गोलंदाजीने जाडेजाने कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आपली गुणांची आघाडी वाढवली आहे. त्याच्या खात्यात 893 गुण असून, दुसऱ्या क्रमांकावरच्या जेम्स अँडरसनच्या खात्यात 860 गुण आहेत.
जाडेजा आता कसोटीतील अव्वल ऑलराऊंडर खेळाडू!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Aug 2017 04:06 PM (IST)
टीम इंडियाचा स्टार खेळाडू रवींद्र जाडेजाने आता आयसीसीच्या कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं. अगोदरपासूनच तो कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीतही अव्वल स्थानावर कायम आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -