विजयवाडा : रणजी करंडक स्पर्धेचा सुरुवातीचा सामना एका विचित्र कारणामुळे थांबवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विदर्भ विरुद्ध आंध्र प्रदेश सामन्यादरम्यान चक्क एक साप मैदानात शिरला होता. त्यामुळे काही वेळ सामना थांबवावा लागला. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हीडीओ शेअर केला आहे.
विदर्भ विरुद्ध आंध्र प्रदेशमधील सामना एसीए क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जात आहे. विदर्भचा कर्णधार फैज फजलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सामना सुरु झाल्यानंतर काही वेळानंतर मैदानात साप शिरला. त्यामुळे सापाला बाहेर काढण्याचीसाठी सर्वांचीच धावपळ सुरु झाली.
काही वेळानंतर या सापाला बाहेर काढण्यात यश आलं. बीसीसीआय डोमेस्टिकने हा 13 सेकंदाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विदर्भचा वसिम जाफरचा आजचा 150 सामना आहे. 150 रणजी सामने खेळणार वसिम जाफर पहिलाच खेळाडू आहे.