मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक तुषार अरोठे यांनी राजीनामा दिल्यानंतर संघाला नवे प्रशिक्षक मिळाले आहेत. बीसीसीआयने भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू रमेश पोवरची तातडीने अंतरिम प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आहे.
खेळाडूंसोबत मतभेद असल्याच्या कारणावरुन तुषार अरोठे यांनी 10 जुलै रोजी भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.
भारतीय महिला संघ 25 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान बंगळुरुतील कॅम्पमध्ये सहभागी होणार आहे. त्याआधी मुंबईकर रमेश पोवारकडे अंतरिम प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अंतरिम प्रशिक्षकाची नियुक्ती करुनही बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. संघाला जोपर्यंत मुख्य प्रशिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत पोवार संघाच्या सर्व निर्णयांमध्ये सहभागी असेल. यावेळी सहाय्यक प्रशिक्षक बीजू जॉर्ज त्यांच्या मदतीला असतील.
तर दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच झालेल्या मुंबई रणजी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या निवडणुकीत माजी यष्टीरक्षक विनायक सांमतकडून रमेश पोवारचा पराभव झाला होता.
रमेश पोवार भारतीय महिला क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2018 12:32 PM (IST)
खेळाडूंसोबत मतभेद असल्याच्या कारणावरुन तुषार अरोठे यांनी 10 जुलै रोजी भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -