नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा यांनी टीम इंडियाचा विकेटकीपर महेंद्र सिंह धोनीच्या ए ग्रेड कॉन्ट्रॅक्टवर आक्षेप घेतला आहे. बीसीसीआयने धोनीला आता ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट देऊ नये, कारण तो आता कसोटी सामने खेळत नाही, असं रमीज राजा यांनी म्हटलं आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे. धोनीने कसोटीतून निवृत्ती घेऊनही त्याला ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आहे. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शाहिद आफ्रिदी निवृत्त झाल्यानंतरही त्याला ए ग्रेडमध्ये ठेवलं असल्याबद्दल रमीज राजा यांनी चिंता व्यक्त केली.
दरम्यान यापूर्वी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या कमिटी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनचे (सीओए) सदस्य रामचंद्र गुहा यांनीही राजीनामा देताना धोनीच्या ए ग्रेड कॉन्ट्रॅक्टवर आक्षेप घेतला होता. गुहा यांनी सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांना पत्र लिहून भारतीय क्रिकेटमध्ये सुपरस्टार सिस्टम लागू असल्याचं सांगितलं होतं.