केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे आजच्या पहिल्या सत्रात एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. केपटाऊनध्ये सुरु असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावात दोन बाद 65 धावांची मजल मारली आहे.

पहिल्या डावातली 77 धावांची आघाडी जमेस धरून, दक्षिण आफ्रिकेकडे आता एकूण आघाडी 140 धावांची आघाडी आहे. दक्षिण आफ्रिकेने केपटाऊन कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर दोन बाद 65 धावांची मजल मारली होती.

त्याआधी, या कसोटीत भारताच्या हार्दिक पंड्याचं झुंजार शतक अवघ्या सात धावांनी हुकलं, पण त्याने भुवनेश्वर कुमारच्या साथीने रचलेल्या भागिदारीने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 77 धावांचीच आघाडी मिळू दिली.

त्या दोघांनी आठव्या विकेटसाठी धावांची 99 धावांची भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांनी भारताची सात बाद 92 अशी केविलवाणी अवस्था केली होती. त्या कठीण परिस्थितीत हार्दिक पंड्या टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. त्याने 95 चेंडूंत 14 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 93 धावांची खेळी उभारली. भुवनेश्वर कुमारने चार चौकारांसह 25 धावांची संयमी खेळी केली.