Rahul Gandhi And Lionel Messi: अर्जेंटिनाचाच नव्हे, अवघ्या जगाच्या पाठीवर फुटबॉलपटूच्या गळ्यातील ताईत असलेला लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आहे. तब्बल 14 वर्षांनी भारतात आल्यानंतर कोलकातामध्ये अभूतपूर्व राडा झाला, पण हैदराबादमध्ये दिमाखात स्वागत झाले. कोलकात्यातील त्याचा अनुभव फारसा चांगला नव्हता. साल्ट लेक स्टेडियममधील गोंधळामुळे त्याने फक्त 22 मिनिटांत स्टेडियम सोडले. हैदराबादमध्ये त्याने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत फुटबॉल खेळत आणि मुलांसोबत मजा केली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा उपस्थित होते. दोघांमध्ये चर्चा होताना सुद्धा दिसून आली. मेस्सीने अर्जेटिनाची जर्सी राहुल यांना भेट दिली. ज्याचे फोटो राहुल गांधींनी स्वतः त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल यांनीही हैदराबादमध्ये मेस्सीसोबत आनंद द्गिगुणित केला.
मेस्सी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर थोडा उशिरा पोहोचला, परंतु त्याने कॅमेऱ्याकडे पाहिले आणि चाहत्यांचे अभिनंदन स्वीकारताच प्रेक्षकांमध्ये आनंदाची लाट उसळली. तिन्ही फुटबॉलपटूंनी मुलांसोबत खूप मजा केली. फुटबॉल सामन्यादरम्यान मेस्सी, सुआरेझ, डी पॉल आणि रेड्डी यांच्या कौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. हैदराबादला निरोप देताना मेस्सीने आयोजकांना अर्जेंटिना फुटबॉल जर्सी भेट दिली. स्पॅनिश भाषेत चाहत्यांचे आभारही मानले.
मेस्सीने राहुल गांधींना टी-शर्ट भेट दिली
राहुल गांधी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर लिओनेल मेस्सीसोबतचे फोटो शेअर केले. त्यांनी प्रथम एक व्हिडिओ क्लिप शेअर केली ज्यामध्ये ते लिओनेल मेस्सी, रॉड्रिगो डी पॉल आणि लुईस सुआरेझ यांच्यासोबत चालत असल्याचे दिसत आहे आणि त्यांनी एकत्र फोटोशूटसाठी पोज देखील दिली. दुसऱ्या एका फोटोमध्ये लिओनेल मेस्सी त्यांना टी-शर्ट देताना दिसत आहे.
यापूर्वी, लिओनेल मेस्सीने कोलकातामध्ये त्यांच्या 70 फूट उंच स्मारकाचे अनावरण केले. तथापि, साल्ट लेक स्टेडियमवर पोहोचल्यानंतर चाहत्यांनी मैदानावर बाटल्या आणि इतर वस्तू फेकण्यास सुरुवात केली. यामुळे मेस्सीला मैदानाबाहेर नेण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेबद्दल सोशल मीडियाद्वारे मेस्सी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची माफी मागितली.
इतर महत्वाच्या बातम्या