बंगळूर : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये स्वप्नवत कामगिरी करत असलेला न्यूझीलंडचा राॅकस्टार रचिन रविंद्र मोठा पराक्रम आपल्या नावे करणार आहे. न्यूझीलंडसाठी उगवता तारा असलेला रचिन रवींद्र आज एका बाबतीत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकतो. आज होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात (New Zealand vs Sri Lanka) एक धाव काढताच तो विक्रम आपल्या नावावर करेल. 25 वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे. सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. 






सचिन तेंडुलकरने वयाच्या 25 वर्षापूर्वीच विश्वचषकात 523 धावा केल्या होत्या. त्यांचा हा विक्रम फार काळ कोणीही मोडू शकले नव्हते. रचिन रवींद्रने गेल्या सामन्यात या विक्रमाची बरोबरी केली. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने आतापर्यंत 523 धावा केल्या आहेत. आता आजच्या सामन्यात सचिनला पराभूत करण्यासाठी त्याला फक्त एका धावेची गरज आहे.






नावामागील रंजक कथा


रचिन रविंद्रचे आई-वडील क्रिकेटचे चाहते होते. त्याला सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड खूप आवडायचे. त्यामुळेच या दोन दिग्गज फलंदाजांची नावे एकत्र करून त्यांनी आपल्या मुलाचे नाव निर्माण केले. तर, रचिननेही आपले नाव सिद्ध केले आहे. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडची झलक त्याच्या फलंदाजीतही दिसते.






2023 च्या विश्वचषकात रचिन रवींद्रची बॅट तळपली


विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रचिन रवींद्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 523 धावा केल्या आहेत. तो क्विंटन डी कॉकपेक्षा फक्त 27 धावांनी मागे आहे. रचिनने या स्पर्धेतही तीन शतके झळकावली आहेत. तो 74.71 च्या फलंदाजीची सरासरी आणि 107.39 च्या स्ट्राईक रेटने धावा करत आहे. या विश्वचषकात तो न्यूझीलंडसाठी ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध झाले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या