Pakistan Cricket Team : वर्ल्डकप सेमीफायनलसाठी (ICC Cricket World Cup 2023) तीन संघ फायनल झाले असले, तरी चौथ्या स्थानाची रेस अजूनही कायम आहे. एक जागा आणि तीन संघ दावेदार अशी स्थिती चौथ्या जागेसाठी झाली आहे. टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यापूर्वीच सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. पहिल्या नंबरवर असलेल्या टीम इंडियाची लढत चौथ्या स्थानावरील टीमशी होणार आहे. त्यामुळे चमत्कार झाल्यास पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan Semi Finals scenario in mumbai) लढत आणि ती सुद्धा सेमीफायनलची होऊ शकते. मात्र, पाकिस्तानला इतर संघाच्या कामगिरीवर विसंबूनर राहावं लागेल. 


उपांत्य फेरीतील तीन संघ ठरले, अंतिम स्थानासाठी शर्यत सुरू 


विश्वचषक 2023 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. आता फक्त एकच जागा शिल्लक आहे आणि त्यासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात शर्यत आहे. या शर्यतीत जो संघ पुढे येईल त्याला गुणतालिकेत चौथे स्थान मिळेल. अशा स्थितीत चौथ्या पात्रता मिळवणाऱ्या संघाला उपांत्य फेरीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या टीम इंडियाचा सामना करावा लागेल. आता पाकिस्तानने अंतिम 4 मध्ये प्रवेश केला तर उपांत्य फेरीत त्याचा सामना भारताशी होईल.






पाकिस्तान कसा पात्र होऊ शकतो?


पाकिस्तानला शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. सोबत न्यूझीलंडला श्रीलंकेविरुद्ध पराभूत व्हावं लागेल आणि त्यांचा रनरेटही पाकिस्तानच्या खाली असायला हवा. त्याचबरोबर अफगाणिस्तानलाही पराभव स्वीकारावा लागेल आणि रनरेटही खाली असायला हवा, तरच हे समीकरण जुळून येऊ शकतं. 


जर पाकिस्तान पात्र ठरला तर भारत ईडन गार्डन्सवर खेळेल 


वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाला आपला सेमीफायनल सामना वानखेडेवर खेळायचा आहे. मात्र, पाकिस्तान पात्र ठरल्यास स्थळ आणि वेळापत्रक बदलेल. त्यानंतर नंबर-1 आणि नंबर-4 संघ वानखेडेऐवजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आमनेसामने येतील. तारखेतही बदल होणार आहे. हा सामना 15 नोव्हेंबर ऐवजी 16 नोव्हेंबरला होणार आहे.


गांगुली म्हणतात पाकिस्तानला सेमीफायनला यावा 


टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी वर्ल्डकप 2023 च्या सेमीफायनल सामन्यासाठी मोठा दावा केला आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीत खेळताना पाहायचे आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तथापि, त्याच्या इच्छेमागील तर्क असा आहे की जर पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला तर त्याचा सामना फक्त भारताशी होईल आणि गांगुली म्हणतात की उपांत्य फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यापेक्षा चांगले काय असू शकते. गांगुली म्हणाले की, 'पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठून भारताविरुद्ध खेळावे अशी माझी इच्छा आहे. यापेक्षा मोठा उपांत्य सामना असूच शकत नाही.


इतर महत्वाच्या बातम्या