लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या कडू आठवणी घेऊन इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेसमोरचे विघ्न थांबता थांबत नाहीत. गोलंदाजीदरम्यान शिव्या दिल्याने कागिसो रबाडावर एका कसोटी सामन्याची बंदी आणण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडावर एका कसोटी सामन्यासाठी बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे इंग्लंडविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात रबाडा खेळू शकणार नाही. गोलंदाजीदरम्यान कागिसो रबाडाने गोलंदाजीदरम्यान आक्षेपार्ह शब्द वापरले. इंग्लंडचा फलंदाज बेन स्टोक्सला आऊट केल्यानंतर शिव्या दिल्या. यामुळे रबाडावर एका कसोटीसाठी बंदीची कारवाई करण्यात आली. रबाडावर एका कसोटीसाठी बंदी आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही फेब्रुवारी महिन्यात केपटाऊनमध्ये श्रीलंकेविरोधातील वनडे सामन्यादरम्यान रबाडाने निरोश डिकवेलाविरोधात अपशब्दांचा वापर केला होता. त्यानंतरही रबाडावर एका कसोटी सामन्याची बंदी आणण्यात आली होती.