अश्विनने आपल्या ट्विटमध्ये, ''तुम्ही माझे प्रेरणास्त्रोत आहात. 2001मध्ये तुम्हाला गोलंदाजी करताना पाहून मी ही गोलंदाजी करण्यास सुरुवात केली होती.''
अश्विनच्या या ट्वीटचे उत्तर देताना, ''हरभजनने आपल्या मनात तुझ्याबद्दल कसलाही राग नसल्याचं म्हटलं आहे. तसेच माझ्या शब्दांचा विपर्यास केला गेला. माझ्याकडून तुला शुभेच्छा,'' असल्याचं हरभजन यावेळी म्हणाला.
यानंतर अश्विनने पुन्हा ट्वीट करुन हरभजनला उत्तर दिलं आहे. ''आपल्याला एकमेकासमोर उभे ठाकून कोणताही फायदा नाही. हाँ, केवळ मजेशीर हेडलाईन्स तयार होतील. चांगल्या खेळासाठी एकमेकांचा सन्मान करणे गरजेचे आहे.''
वास्तविक, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या मालिकेत त्याला मालिकावीर या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. यानंतर हरभजन सिंहने पिच क्यूरेटरला टोकून ट्विट केलं होतं. हरभजनने आपल्या त्या ट्विटमध्ये आमच्या काळात अशाप्रकारचे स्पिन फ्रेण्डली पिच नव्हते. असं म्हटलं होतं.
यानंतर हरभजनच्या या ट्विटला उत्तर देताना कसोटी कर्णधार विराट कोहलीने पिच तुम्हाला विकेट देत नाही. तर विकेट तुम्हाला तुमच्या गोलंदाजी आणि तुमच्या टॅलेंटने मिळते असं म्हटलं होतं.
अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अश्विनने एकूण 27 विकेट घेतल्या होत्या.
2011साली आर. अश्विनने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर हरभजनने अश्विनपेक्षा 13 वर्ष आधी म्हणजे 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, अश्विनच्या उत्तमोत्तम कामगिरीसमोर हरभजन फीका पडला.