सचिन, सेहवागचा विक्रम मोडीत, अश्विनची दमदार कामगिरी!
यानंतर मॅच रेफ्री रंजन मदुगले यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डर या दोघांशी चर्चा करून सामना अनिर्णीत घोषित केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेवटच्या सामन्यात केवळ 22 षटकांचा खेळ झाला. यात वेस्ट इंडिज संघाने दोन बाद 62 धावा केल्या. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाच्या व्यत्ययाने खेळ सुरु होऊ शकला नाही.
यापूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि अश्विन यांनी पाचवेळा मालिकावीर बनण्याचा बहुमान मिळवला होता. अश्विनने सहावेळा मालिकावीराची ट्रॉफी जिंकून सचिन आणि सेहवागलाही पिछाडीवर टाकले.
सहावेळा मालिकावीराचा बहुमान मिळाल्यामुळे, अश्विनने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले.
सामन्याच्या शेवटच्या दिवशी अवॉर्ड सेरेमनीवेळी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अश्विनला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
वेस्ट इंडिज विरूद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यावर पावसाने पाणी फिरवल्यानंतर भारतीय संघाने मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली. या मालिकेदरम्यान भारतीय संघातील स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने नवा विक्रम प्रस्थापित केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -