हाँगकाँग : भारताच्या रिओ ऑलिम्पिकमधल्या रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला हाँगकाँग ओपनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

अंतिम सामन्यात चीन तैपैईच्या चौथ्या मानांकित तै झू यिंगने सिंधूवर 21-15, 21-17 अशी सरळ गेम्समध्ये मात केली. त्यामुळं चायना ओपनपाठोपाठ सलग दुसरं सुपर सीरिज विजेतेपद मिळवण्याचं सिंधूचं स्वप्न भंगलं.

या सामन्यात सिंधूने तै झू यिंगसमोर अवघ्या 41 मिनिटांत हार स्वीकारली. विशेष म्हणजे तै झू यिंगने उपांत्य फेरीत वर्ल्ड नंबर वन आणि रिओ ऑलिम्पिकची सुवर्णपदक विजेती कॅरोलिन मरिनला धूळ चारली होती. त्यानंतर आता रिओ ऑलिम्पिकच्या रौप्यविजेत्या सिंधूलाही तै झून यिंगने गुडघे टेकवायला लावले.