FPI: गेल्या काही दिवसापासून सातत्याने जागतिक आणि देशांतर्गंत शेअर बाजार अस्थिर आहे. शेअर बाजाराला खरंतर चढ-उतार हे जरी नेहमीचे असले तरीसुद्धा अलिकडच्या काळातील युद्धासारख्या घडामोडींच्या मुळे गुंतवणूकदार चांगलेच धास्तावले आहेत. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी होतो आहे, असं तज्ज्ञांचे मत आहे.


बाजारातील घडामोडींच्या विषयी जाणून घेतानाच, शेअर बाजार इतक्या मोठ्या प्रमाणात अस्थिर होत असल्याचं एक प्रमुख कारण समोर आलं आहे. हे कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांनी यावर्षी भारतीय बाजारातून 1.14 लाख कोटी रुपये काढले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे 


विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) या वर्षात आतापर्यंत भारतीय बाजारातून 1,14,855.97 कोटी रुपये काढले आहेत. त्याच वेळी, या महिन्याबद्दल बोलायचे तर, एफपीआयने भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 48,261.65 कोटी रुपये काढले आहेत. 


भौगोलिक-राजकीय तणाव आणि चलनवाढीच्या चिंतेमध्ये विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेत विक्री करत आहेत. डिपॉझिटरी डेट नुसार, आजपर्यंत, 2022 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी काढलेल्या रकमेचा आकडा 1,14,855.97 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून निव्वळ पैसे काढण्याचा हा सलग सहावा महिना आहे.


तज्ज्ञ काय म्हणतात


रशिया-युक्रेन युद्धामुळे स्थूल-आर्थिक परिस्थिती आणि जागतिक स्तरावर महागाईचा दबाव यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून माघार घेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


“रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम फारच मर्यादित आहे, कारण या देशांवर आमची आयात अवलंबून नाही. मात्र, वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे आव्हाने निर्माण होत असल्याचं कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या वरिष्ठ EVP आणि प्रमुख (इक्विटी रिसर्च)  शिबानी कुरियन यांनी म्हटलं आहे.  


भारत हा कच्च्या तेलाचा निव्वळ आयातदार आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ झाल्याने चालू खात्यातील तूट (CAD) 0.3 टक्क्यांनी, CPI-आधारित महागाई 0.4 टक्क्यांनी आणि सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 0.2 टक्क्यांनी प्रभावित होईल असा अंदाज ही कुरियन यांनी वर्तवला.


डेटा काय सांगतो


डिपॉझिटरी डेटानुसार, FPIs ने जानेवारीमध्ये भारतीय शेअर बाजारातून 28,526.30 कोटी रुपये काढले. फेब्रुवारीमध्ये त्यांची रक्कम 38,068.02 कोटी रुपये होती. त्याच वेळी, मार्चमध्ये आतापर्यंत त्यांनी 48,261.65 कोटी रुपयांची विक्री केली आहे.