मोहाली : आयपीएलच्या रणांगणात किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 10 विकेट्स राखून विजय मिळवला. पंजाबच्या गोलंदाजांनी दिल्लीचा डाव केवळ 67 धावांमध्येच गुंडाळला होता.
दिल्लीने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर मार्टिन गप्टील 50 आणि हाशीम आमलाने 16 धावा ठोकत 10 विकेट्स राखून विजय मिळवला. पंजाबचा या आयपीएल मोसमातील हा चौथा विजय ठरला.
पंजाबच्या गोलंदाजांनी मोहालीच्या मैदानावर गोलंदाजीचं अनोखं प्रदर्शन घडवलं. संदीप शर्माने चार, अक्षर पटेल आणि वरुन अॅरॉन प्रत्येकी दोन आणि ग्लेन मॅक्सवेल आणि मोहित शर्माने प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.