मुंबई : टीम इंडियाचे सारे शिलेदार आयपीएलच्या रणांगणात व्यस्त असताना चेतेश्वर पुजारा मात्र क्रिकेटच्या मैदानात दूर सुट्टी एन्जॉय करतो आहे. भारताच्या कसोटी संघाचा हाच शिलेदार आता इंग्लंडमधल्या कौंटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. नॉटिंगहॅमशायर कौंटीनं ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनला पर्याय म्हणून पुजाराची निवड केली आहे. आयपीएलच्या फेब्रुवारीत झालेल्या लिलावात आठही फ्रँचाईझींनी त्याच्यावर बोली लावण्याचं टाळलं होतं. कारण पारपंरिक शैलीनं खेळणारा फलंदाज अशीच पुजाराची क्रिकेटच्या जगात ओळख आहे. भारताच्याही वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी संघांमध्ये त्याची निवड होत नाही. आयपीएलचा दीड महिना आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे पंधरा दिवस पुजाराला सक्तीची विश्रांती मिळाली आहे. या कालावधीत पुजारा कौंटी क्रिकेट खेळून सुटीचा सदुपयोग करण्याचा पुजाराचा प्रयत्न आहे.