स्मार्ट बुलेटिन | 19 ऑगस्ट 2019 | सोमवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 19 Aug 2019 09:14 AM (IST)
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. औरंगाबाद-शहादा एसटीला धुळ्यातील निमगूळ गावाजवळ भीषण अपघात, धडकेत एसटी आणि कंटनेर चालकासह 15 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी २. कोहिनूरप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडीची नोटीस, 22 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश, निवडणुकीच्या तोंडावर कारवाई केल्याचा आरोप 3. आता पाकिस्तानशी चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा इशारा, तर कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरल्याची टीका 4. कावळ्यांची नाही तर मावळ्यांची चिंता करा, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवारांचा सल्ला, तर भाजपचं काँग्रेसीकरण सुरु असल्याचा जयंत पाटलांचा टोला 5. पूरग्रस्त भागात 'बालभारती'कडून मोफत पुस्तके, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलारांची माहिती, तीन दिवसात दीड लाख पुस्तकांचं वाटप 6. पेटती मेणबत्ती फ्रीजजवळ ठेवल्याने स्फोट, संपूर्ण घर पेटलं, कोल्हापुरातील आलास गावातील घटना, सुदैवाने जीवितहानी टळली 7. डोंबिवलीच्या मधुबन चित्रपटगृहात 'मिशन मंगल'चा शो सुरु असताना सीलिंग कोसळलं, महिला आणि लहान मुलगी जखमी 8. स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना दिलासा, गृहकर्जात 0.20 टक्क्यांनी कपात, नवा व्याजदर 8.05 टक्के सप्टेंबरपासून लागू 9. तिहेरी तलाकचा विरोध केल्याने पत्नीला जिवंत जाळलं, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना, पती आणि सासऱ्याविरोधात गुन्हा 10. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधला अॅशेस मालिकेतला दुसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित, ऑस्ट्रेलियाची मालिकेत 1-0 अशी आघाडी कायम