मुंबई : स्टार स्पोर्टसच्या प्रो कबड्डी लीगच्या लिलावात यंदा पहिल्यांदाच अर्धा डझन खेळाडूंवर एक कोटीहून अधिक रकमेची बोली लागली. मोनू गोयतला हरयाणा स्टीलर्सनं सर्वाधिक एक कोटी 51 लाखांची बोली लावून आपल्या ताफ्यात सामील केलं. दबंग दिल्लीनं एक कोटी 29 लाख रुपये मोजून राहुल चौधरीला विकत घेतलं. अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सनं दीपक हूडावर एक कोटी 15 लाखांची यशस्वी बोली लावली. तेलुगू टायटन्सनं एक कोटी 29 लाख रुपये मोजून राहुल चौधरीला आपल्याकडे कायम राखलं. गेल्या मोसमात याच नितीन तोमरवर यूपी योद्धानं 93 लाखांची सर्वाधिक बोली लावली होती. यूपी योद्धानं यंदा महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगाला एक कोटी 11 लाख रुपये मोजून खरेदी केलं. यू मुम्बानं इराणच्या फझल अत्राचेलीमध्ये एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.