याच सामन्यात युवा फलंदाज पृथ्वी शॉनेही महत्त्वाची भूमिका निभावली, ज्याचं मोठं कौतुक केलं जात आहे. सलामीला आलेल्या पृथ्वी शॉने 44 चेंडूत 62 धावांची खेळी केली, ज्यामध्ये दोन षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता.
या अर्धशतकासोबतच आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही पृथ्वी शॉच्या नावावर जमा झाला. त्याने संजू सॅमसनच्या विक्रमाची बरोबरी साधली.
पृथ्वी शॉचं वय सध्या 18 वर्षे 169 दिवस आहे. एवढ्याच वयात यापूर्वी संजू सॅमसनने अर्धशतक ठोकलं होतं. संजू सॅमसनने हा विक्रम 2013 साली केला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी संजू सॅमसनच्या विक्रमाची बरोबरी साधली.
भारतीय अंडर-19 संघाचा कर्णधार पृथ्वी शॉने आतापर्यंत केवळ दोनच सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. पहिल्या सामन्यात शानदार सुरुवात करत त्याने 22 धावा केल्या होत्या, तर कालच्या सामन्यात 62 धावांची खेळी उभारली.
संबंधित बातमी :