मेरठ : क्रिकेटपटू प्रवीण कुमार राजकारणाच्या आखाड्यात उतरत असल्याचं वृत्त आल्यानंतर काही तासांतच त्याच्या भावाने या वृत्ताचं खंडन केलं आहे. प्रवीण कुमार समाजवादी पक्षात प्रवेश करत नसून फक्त अखिलेश सरकारच्या स्पोर्ट्स प्रमोशन अभियानाशी जोडला गेला असल्याचं स्पष्टीकरण प्रवीणचा भाऊ विनयकुमारने दिलं आहे.


 

 

अखिलेश कुमार यांच्या उपस्थितीत प्रवीण कुमारने समाजवादी पक्षात प्रवेश केल्याची माहिती होती. मात्र प्रवीणचा भाऊ विनयकुमार याच्या दाव्यानुसार प्रवीणने फक्त अखिलेश सरकारच्या अभियानात भाग घेतला आहे. 'आज तक'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

 
प्रवीणने सहा कसोटी आणि 68 वनडे सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्याच्या नावावर कसोटीत 27 आणि वनडेत 77 विकेट्स जमा आहेत. प्रवीण खराब फॉर्ममुळे 2012 पासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. मेरठमध्ये राहणारा 29 वर्षांचा प्रवीण कुमार पाच वर्ष टीम इंडियात खेळत होता.