मुंबई : एमआरपीच्या नावाखाली मनमानीपणे वस्तूंची विक्री करणाऱ्यांना सरकार चाप लावणार आहे. कारण, डाळ, दूध, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे दर सरकार आता निश्चित करणार आहे.
ग्राहक आणि अन्न-नागरी पुरवठा खात्यानं हा निर्णय घेतला आहे. सुट्या आणि पॅकेजिंग वस्तूंच्या दरात मोठा फरक असतो. म्हणून अनेकदा दुकानदार हव्या त्या किमतींना वस्तूंची विक्री करतात. त्यामुळे सरकार हा महत्वपूर्ण निर्णय घेणार आहे.
तसं झाल्यास सरकारनं निश्चित केलेल्या दरांपेक्षा दुकानदाराला त्यापेक्षा वाढीव दरानं विक्री करता येणार नाही. तरीही एखाद्या दुकानदाराकडून मनमानी कारभार सुरुच असेल तर त्यासाठी शिक्षेची तरतूद केली गेली आहे.