ब्रिस्टोल (इंग्लंड): आयसीसी महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईकर पूनम राऊतं खणखणीत शतक ठोकलं. या शतकाच्या जोरावर भारतीय महिलांनी विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी  227 धावांचं आव्हान दिलं आहे.


या सामन्यात सलामीवीर पूनम राऊतनं कर्णधार मिताली राजच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 157 धावांची मोठी भागीदारी रचली. त्यात मिताली राजचा वाटा होता 69 धावांचा होता. तर पूनमनं 136 चेंडूंत 11 चौकारांसह 106 धावांची खेळी उभारली. तिचं हे वन डे कारकीर्दीतलं दुसरं शतक आहे.

दरम्यान याआधीही पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात पूनमनं मोलाची भूमिका बजावली होती. तिनं यावेली 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होता. या सामन्यात भारतानं 95 धावांनी  पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता.