नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनण्याआधी जसे होते, तसेच आजही आहेत. प्रसिद्धीचा परिणाम त्यांच्या कामावर होत नाही असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.


नवी दिल्लीमध्ये द मेकिंग ऑफ लिजेंड या पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. बिंदेश्वर पाठक यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

या कार्यक्रमाला भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मोहन भागवत म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कशालाही असंभव मानत नाहीत. अशक्य ते शक्य करुन दाखवतात. मोदींचं नेतृत्व हे भारतासाठी आशेचं किरण आहे".

तर अमित शाहा म्हणाले, "मोदी सरकार सत्तेत येण्याआधी त्यांच्यावर परराष्ट्र निती सांभाळता येणार नाही अशी टीका झाली. मात्र आज मोदी सरकारचे सगळ्या देशांशी चांगले संबंध आहेत"