नवी दिल्ली : भारताच्या दृष्टीहीन क्रिकेटवीरांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलवरुन प्रत्येक खेळाडूसोबतचा फोटो ट्वीट करत, मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतानं 12 फेब्रुवारीला बंगळुरूत झालेल्या अंतिम फेरीत पाकिस्तानला 9 विकेट्स राखून हरवलं होतं आणि सलग दुसऱ्यांदा दृष्टीहीनांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं होतं. त्या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंच्या पाठीवर पंतप्रधानांनी कौतुकाची थाप दिली आहे.

भारतीय खेळाडूंनी यावेळी मोदींना टीमची जर्सी तसंच स्वाक्षरी केलेली बॅट आणि बॉलही भेट दिला. मोदींनीही खेळाडूंसाठी बॅट आणि बॉलवर स्वाक्षरी केली.

https://twitter.com/narendramodi/status/836511149621313536

तसंच सर्वांसोबत फोटोही काढले. भारताच्या दृष्टीहीन क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूसोबतचा फोटो मोदींनी ट्विटरवरही पोस्ट केला आहे आणि प्रत्येकाचं अभिनंदन केलं आहे.