टी-20 तील षटकारांचे बादशाह कोण?
भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये टी-20 बाबत वेगळाच उत्साह असतो. कारण या क्रिकेटमध्ये जलद धावांसोबतच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. या फॉर्मेटमध्ये कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक षटकार लगावले याची यादी नुकतीच प्रकाशित झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनवेळा द्विशतक ठोकणाऱ्या हिटमॅन रोहत शर्माचा या यादीत सातवा क्रमांक आहे. रोहितने 236 सामन्यातून 254 षटकार ठोकले. रोहित सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत असून, त्याच्या नेतृत्वाखाली संघाने दोनवेळा चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे.
वॉर्नरच्या खालोखाल शेन वॉटसननेही चांगली कामगिरी केली आहे. वॉटसनने 207 सामन्यांमधून 270 षटकार लगावले आहेत. सध्या तो मोस्ट एन्टरटेनिंग टीम रॉयल चॅलेंजर्सकडून खेळत आहे.
टी-20 फॉर्मेटमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंची चांगली कामगिरी नसली, तरी ऑस्रे्थलियाच्या डेविड वॉर्नरने समाधानकारक कामगिरी करत पाचव्या स्थानी धडक मारली आहे. वॉर्नरने 220 सामन्यांमधून 288 षटकार लगावले. वॉर्नर सध्या सनराइजर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करतो. आयपीएलच्या गेल्या पर्वातील सनराइजर्सच्या कामगिरीत त्याची कामगिरी लक्षवेधी होती. वॉर्नर यापूर्वी दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळत होता.
या यादीत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा बोलबाला दिसतो. कारण चौथ्या स्थानी वेस्ट इंडिजचा अष्टपैलु खेळाडू डवेन स्मिथचा नंबर आहे. स्मिथने 267 सामन्यांमधून 305 षटकार लगावले आहेत. सध्या आयपीएलमध्ये स्मिथ गुजरात लॉयन्सकडून खेळतो आहे. या पूर्वी तो चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्सकडून खेळत होता.
आयपीएलच्या पहिल्या पर्वातील पहिल्याच सामन्यात धडाकेबाज शतक झळकावणाऱ्या न्यूझीलंडच्या मॅक्कूलमचा तिसरा क्रमांक आहे. सध्या मॅक्कूलम गुजरात लॉयन्सकडून खेळत असून यापूर्वी कोलकता नाईट राइडर्स आणि कोची टस्कर्सकडूनही दमदार खेळी केली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर गेलचा सहकारी किरोन पोलार्ड याचा नंबर आहे. मुंबई इंडियनसच्या या फलंदाजाने 324 सामन्यातील 290 खेळीमध्ये 415 षटकार लगावले. पोलार्ड जगभरातील इतर टूर्नामेंटमध्येही उत्तम कामगिरी करताना पाहायला मिळतो.
या यादीत पहिल्या नंबरवर टी-20 चा किंग ख्रिस गेल आहे. गेलची बॅट टी-20 च्या फॉर्मेटमध्ये मेघगर्जनेसह षटकारांचा पाऊस पाडते. गेलने अद्याप 272 टी-20 सामन्यांमधून एकुण 707 षटकार लगावले आहेत.
या यादीत दहाव्या स्थानी रॉस टेलरचा क्रमांक आहे. टेलरने 222 सामन्यातून 238 षटकार लगावले आहेत.
यादीच्या अंतिम टप्प्यात चेन्नई सुपर किंगच्या सुरेख रैनाचा क्रमांक आहे. रैनाने 242 टी-20 सामन्यातून 246 षटकार लगावत नवव्या स्थानी धडक मारली. चेन्नई सुपर किंगवर बंदी घालण्यात आल्याने, रैना सध्या गुजरात लॉयन्सचे नेतृत्व करत आहे.
या यादीत आठव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेच्या रियान टेन डोसेट आहे. त्याने 282 सामन्यातून एकुण 247 षटकार ठोकले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -