रवी शास्त्री यांच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत होता. या फोटोवरुन सोशल मीडियावर अनेक मीम्स तयार झाले आहेत. या व्यक्तीचा चेहरा रवी शास्त्री यांच्याशी अतिशय मिळताजुळता आहे. याआधी वाढलेल्या ढेरीमुळे रवी शास्त्रींना ट्रोल केलं जात होता. आता त्यांच्या डुप्लिकेटमुळे ते चर्चेत आहेत.
मजेशीर कमेंट्स
रवी शास्त्री यांच्या डुप्लिकेटचा फोटो शेअर करताना युझर्स अनेक मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युझरने म्हटलं आहे की, बीसीसीआयने दिवाळी बोनस दिला नाही, यामुळे रवी शास्त्री जनरल डब्ब्यात प्रवास करत आहेत.
तर आणखी एका युझरने फोटोसह कॅप्शन लिहिलं आहे की, विराट कोहली टीममध्ये नसताना रवी शास्त्रींची अवस्था.
विराट कोहलीने रवी शास्त्रीं ना पार्टीचं आमंत्रण न दिल्याने ते नाराज आहे, असं एकाने म्हटलं आहे.
जेव्हा रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार बनेल तेव्हा रवी शास्त्रींची प्रतिक्रिया अशी असेल, असं आणखी एका युझने म्हटलं आहे.
2019 क्रिकेट विश्वचषकानंतर रवी शास्त्रींची अवस्था अशी होईल, असं कॅप्शन एकाने फोटोला दिलं आहे.