PBKS vs DC, IPL 2021 1st Innings Highlights: आयपीएल 2021 चा 11 वा सामना दिल्ली आणि पंजाब यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. मागील दोन्ही सामन्यात दोन्ही संघांना पराभव स्वीकारावा लागल्याने दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात आहेत. या सामन्यात पंजाबनं पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्लीसमोर 196 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. 


पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी धडाकेबाज सुरुवात करुन दिली. दोघांनी 122 धावांची सलामी दिली. सुरुवातीच्या 6 षटकात या दोघांनी 59 धावा केल्या. तर 10 षटकात पंजाबने 94 धावा केल्या. 13व्या षटकात मयांकने 36 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 69 धावा करत बाद झाला.  त्यानंतर राहुलही अर्धशतक केल्यानंतर 16व्या षटकात रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. राहुलने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 61 धावा केल्या.  राहुलनंतर आलेला गेल 11 धावांवर बाद झाला. पूरनलाही आज केवळ9 धावाच करता आल्या. दीपक हुडाने नाबाद 23 धावा केल्या. तर शेवटी शाहरुख खानने फटकेबाजीमुळे पंजाब 195 धावांवर पोहोचला. शाहरुख खाननं शेवटच्या षटकात दोन चौकार आणि एक षटकार लगावला. 


मागील दोन्ही सामन्यात दोन्ही संघांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा परिस्थितीत दोन्ही संघ विजयीच्या शोधात आहेत. दिल्लीला राजस्थानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर पंजाबचा चेन्नईने पराभव केला. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघांनी विजयासह आपली सुरुवात केली आहे.